गोदरेजच्या इंटेरिओ प्रोजेक्ट्स व्यवसायाचा महसूल ११०० कोटींच्या उंबरठ्यावर
मुंबई, 10 मार्च (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या अग्रगण्य फर्निचर ब्रँड ‘इंटेरिओ बाय गोदरेज’च्या प्रोजेक्ट्स व्यवसायाला देशातील बँकिंग, कॉर्पोरेट आणि पायाभूत क्षेत्रांत वाढत्या टर्नकी वर्कस्पेस सोल्यूशन्सच्या मागणीचा मोठा फायदा होत असून आर्थ
Interio Godrej projects business


मुंबई, 10 मार्च (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या अग्रगण्य फर्निचर ब्रँड ‘इंटेरिओ बाय गोदरेज’च्या प्रोजेक्ट्स व्यवसायाला देशातील बँकिंग, कॉर्पोरेट आणि पायाभूत क्षेत्रांत वाढत्या टर्नकी वर्कस्पेस सोल्यूशन्सच्या मागणीचा मोठा फायदा होत असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये या विभागाचा महसूल सुमारे ११०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कंपनीने अलीकडेच मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक मुख्यालयासाठी सुमारे ७५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या चार मजल्यांच्या टर्नकी इंटीरियर प्रकल्पाची यशस्वी पूर्तता केली आहे.

या आधुनिक प्रकल्पामध्ये भारतातील सर्वात मोठी डीलिंग रूम उभारण्यात आली असून ती बँकेच्या ट्रेझरी आणि गुंतवणूक संबंधित महत्त्वाच्या कामकाजाला सहाय्यभूत ठरणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अत्याधुनिक सीलिंग सिस्टिम्स, मॉड्युलर पार्टिशन्स, संपूर्ण मॉड्युलर फर्निचर, ऑडिओ-व्हिज्युअल प्रणाली तसेच फायर रेटेड स्टोरेज यांचा समावेश करण्यात आला आहे. संसाधनांचे योग्य नियोजन, प्रक्रियेत सातत्याने सुधारणा आणि तरुण व्यावसायिकांच्या समर्पित टीममुळे हा आव्हानात्मक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात कंपनीला यश मिळाले असून ग्राहकांकडूनही त्याचे कौतुक करण्यात आले आहे.

इंटेरिओ बाय गोदरेजचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर यांनी सांगितले की, भारतातील बँकिंग क्षेत्र सध्या मजबूत आर्थिक विस्तार, वाढते वापरण्यायोग्य उत्पन्न आणि सुलभ कर्ज उपलब्धता यामुळे वेगाने प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहारांना अधिक सक्षम बनवण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची आवश्यकता वाढली असून कार्यक्षमता, सुरक्षितता आणि विस्तारक्षमतेचा संगम असलेली कार्यस्थळे निर्माण करणे ही आमची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काटेकोर वेळापत्रक आणि निश्चित बजेटमध्ये उच्च दर्जाचे टर्नकी सोल्यूशन्स देण्याची आमची क्षमता या प्रकल्पातून सिद्ध झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कंपनीने ‘प्रोजेनएक्सटी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल कार्यप्रणालीचा अवलंब करून प्रकल्प व्यवस्थापनात पारदर्शकता आणि संवाद वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच ‘प्रोस्ट्रीम’ या अंतर्गत विकसित सॉफ्टवेअरच्या साहाय्याने क्रिटिकल चेन पाथ पद्धतीवर आधारित प्रकल्प नियोजन करण्यात आले. सध्या इंटेरिओ बाय गोदरेजने कॉर्पोरेट कार्यालये, सरकारी संस्था, बँकिंग, मेट्रो, विमानतळ, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रांसह विविध विभागांत १००० पेक्षा अधिक प्रकल्प पूर्ण करत १० कोटी चौरस फूटांपेक्षा अधिक क्षेत्र विकसित केले आहे. कंपनी येत्या काळात महसूल १५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या दिशेनेही वेगाने वाटचाल करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande