इंडिया ग्रोथ समिट २०२६ साठी वॉलमार्टकडून नोंदणी सुरू
नवी दिल्ली, १० मार्च (हिं.स.) : वॉलमार्टने इंडिया ग्रोथ समिट २०२६ साठी नोंदणी सुरू केल्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम भारतीय व्यवसायांना देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने समर्पित आहे. नवी दिल्लीतील भारत मंडप
Wallmart


नवी दिल्ली, १० मार्च (हिं.स.) : वॉलमार्टने इंडिया ग्रोथ समिट २०२६ साठी नोंदणी सुरू केल्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम भारतीय व्यवसायांना देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने समर्पित आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ७ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिखर परिषदेची दुसरी आवृत्ती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) डिजिटल-प्रथम ब्रँड, डायरेक्ट-टू-कन्झ्युमर (डी २ सी) विक्रेते आणि नावीन्यपूर्ण पुरवठा साखळी विविध कंपन्यांना वॉलमार्टसोबत जागतिक व्यापारातील नवीन संधी शोधण्यासाठी एकत्र आणेल.

वॉलमार्ट मार्केटप्लेसमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्समध्ये आपली उपस्थिती वाढवू इच्छिणाऱ्या भारतीय व्यवसायांसाठी नोंदणी २३ एप्रिल २०२६ पर्यंत खुली असेल. देशांतर्गत वस्त्रोद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्य आणि कल्याण, अन्न, सामान्य मर्चंडाइज, दागिने, कपडे, बूट, खेळणी आणि स्टेशनरी अशा प्रमुख श्रेणींमधील निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही शिखर परिषद मेक इन इंडिया उपक्रमाशी सुसंगत आहे.

इंडिया ग्रोथ समिट २०२६ मध्ये एका चर्चासत्राचे आयोजन केले जाईल. त्यात वॉलमार्टच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली जाईल. त्यानंतर व्यवसायांना त्यांचे कामकाज वाढवण्यात आणि टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी, किरकोळ क्षेत्रातील प्रगतीसाठी माहिती मिळवण्यासाठी आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी तयार केलेली विशेष शिक्षण सत्रे आयोजित केली जातील. उपस्थितांना वॉलमार्ट मार्केटप्लेसवर नोंदणी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे परकीय व्यापाराद्वारे जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. एक समर्पित सुविधा केंद्र असलेल्या वॉलमार्टच्या कॅटेगरी टीम्स आणि संबंधित विषयांमधील तज्ञांच्या मार्गदर्शनासह प्लॅटफॉर्मवरील ऑनबोर्डिंग, नियामक आवश्यकता आणि परदेशी व्यापार चालवण्यास व्यवसायांना मदत करण्यासाठी एकास-एक सल्लागार सहाय्यदेखील देतील.

वॉलमार्ट मार्केटप्लेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनीष जोनेजा म्हणाले, वॉलमार्टमध्ये आम्ही जागतिक स्तरावर व्यवसायांना भरभराटीला आणण्यास मदत करण्यास उत्सुक आहोत. भारत विकास शिखर परिषद २०२६ ही नवसंशोधनाची आमची बांधिलकी आणि जागतिक बाजारपेठेत विक्रेते आणि पुरवठादारांना वाढण्यास मदत दर्शवते. भारतीय उद्योजकांसोबत काम करून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

वॉलमार्टच्या वृद्धी पुरवठादार विकास कार्यक्रमाची सुरूवात २०१९ मध्ये झाली असून तेव्हापासून भारतातील ७०,००० हून अधिक एमएसएमईंना प्रशिक्षण दिले आहे. हा कार्यक्रम २०२८ पर्यंत अतिरिक्त १००,००० लोकांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेसह व्यवसायांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह त्यांची बाजारपेठेत व्याप्ती वाढवण्यात मदत करण्यासाठी साधनसुविधा आणि प्रशिक्षण देत आहे. फ्लिपकार्टवरील १.४ दशलक्ष विक्रेत्यांसह शिखर परिषद उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या संधींबद्दल एक दृष्टीकोन देईल आणि पात्र एमएसएमईंना जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आणि भरभराटीसाठी मार्ग तयार करण्यात मदत करेल.

इंडिया ग्रोथ समिट २०२६ हे नवसंशोधनाचे एक व्यासपीठ म्हणूनही काम करेल. ते पुरवठादारांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, विकसित होणाऱ्या उत्पादनांबाबत अपेक्षा आणि आंतरराष्ट्रीय वाढीस चालना देण्यासाठी साधने लवकर उपलब्ध करून देईल. हा उपक्रम मेक्सिको, चिली, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेसारख्या देशांमधील वॉलमार्टच्या यशस्वी जागतिक कार्यक्रमांवर आधारित आहे, जिथे स्थानिक पुरवठादारांना वॉलमार्टच्या जागतिक नेटवर्कमध्ये आणण्यात आले आहे आहे.

निवडक अर्जदारांना सूचित केले जाईल आणि शिखर परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. त्यांना वॉलमार्टची टीम, विषयातील तज्ञ आणि भारतभरातील समव्यावसायिकांशी संपर्क साधता येईल. त्यांच्या जागतिक यशाच्या प्रवासाला गती देण्यासाठी मौल्यवान माहिती आणि संसाधने प्राप्त करण्याची अनोखी संधी मिळेल. येथे नोंदणी करता येईलः https://ecrm.marketgate.com/Walmart/२०२६/GrowthSummitNewDelhi/About

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande