सोनपेठ पंचायत समितीच्या सभापतीपदी निकिता अवचारे, उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख बिनविरोध
परभणी, 10 मार्च (हिं.स.)। सोनपेठ पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता श्याम अवचारे यांची तर उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवार (दि.१०) रोजी सोनपेठ येथील पंचायत समितीच्या कै. माजी आमदार उ
सोनपेठ पंचायत समितीच्या सभापतीपदी निकिता अवचारे, उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड


परभणी, 10 मार्च (हिं.स.)।

सोनपेठ पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता श्याम अवचारे यांची तर उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवार (दि.१०) रोजी सोनपेठ येथील पंचायत समितीच्या कै. माजी आमदार उत्तमराव विटेकर सभागृहात सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी तथा सह जिल्हा निबंधक डॉ. रतनसिंह साळोखे होते. सभापती पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता अवचारे या एकमेव उमेदवार ठरल्या आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. तर शेलगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह देशमुख यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande