
अकोला, 10 मार्च (हिं.स.)।
अकोला तालुक्यातील २० सहकारी अंतिम अवसायनात असून, अवसायकांची सभा दि. २५ मार्च रोजी सकाळी ११ वा. अकोला तालुका सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय, जिल्हा सहकारी भूविकास बँक, अकोला येथे होणार आहे.
अवसायनाबाबत स्पष्टीकरण, हरकत, आक्षेप असल्यास उपस्थित राहण्याचे आवाहन उपनिबंधक ज्योती मलिये यांनी केले आहे. त्यात सार्थ मागास महिला औद्योगिक सहकारी संस्था, महिला कल्याणी औ. सहकारी संस्था, समृद्धी मागासवर्गीय गारमेंट औ. वस्त्रोद्योग सह. संस्था, माँ पद्मावती महिला औ. स. संस्था, सुरभी अमरप्रीत गृहनिर्माण स. संस्था, सिद्धीविनायक गृहनिर्माण स. संस्था, रामेश्वर गृहनिर्माण संस्था, नूतन खेमका गृहनिर्माण संस्था, अकोला शहर मागास संस्था, मातोश्री सुशिक्षित बेरोजगार बहु. सेवा सह. संस्था, माऊली सुशिक्षित बेरोजगार बहु. सेवा सह. संस्था, सूर्योदय सु. बे. बहु. सेवा. संस्था यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, बालाजी सु. बे. सह. संस्था, लक्ष अभिनव शेती विविध तंत्रज्ञान व संगोपन व समृद्धी सहकारी संस्था, अस्मिता अभिनव सह. संस्था, युवा सु. बे. सेवा सह. संस्था, उन्नती अभिनव शेती वि. तं. सं. व समृद्धी सह. संस्था, हरीसिद्धा सु. बे. सह. संस्था, गणपती बहु. बे. सेवा. सह. संस्था, राष्ट्रतेज सु. बे. सह. संस्था आदी संस्थांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे