परभणी - मानवत पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
परभणी, 10 मार्च (हिं.स.)। मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ललिता उद्धवराव निळे तर उपसभापतीपदी सुरज सुंदरराव काकडे यांची मंगळवारी (दि.१० मार्च) झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर मानवत पंचायत स
मानवत पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता; सभापतीपदी ललिता निळे, उपसभापतीपदी सुरज काकडे यांची बिनविरोध निवड


परभणी, 10 मार्च (हिं.स.)। मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ललिता उद्धवराव निळे तर उपसभापतीपदी सुरज सुंदरराव काकडे यांची मंगळवारी (दि.१० मार्च) झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर मानवत पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

मानवत पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी २ वाजता सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी ताडबोरगाव गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ललिता निळे तर उपसभापतीपदासाठी पाळोदी गणातून निवडून आलेले सुरज काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोघेही एकमेव उमेदवार ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे जोरदार स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सवही साजरा करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य उद्धवराव हरकळ, ज्योती लक्ष्मण शिंदे, अनिला रणखांब, शहनूर पठाण, सरस्वती नाईक, प्रमिला शिवाजी उक्कलकर आदी उपस्थित होते. तसेच आमदार राजेश विटेकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायणराव भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गंगाधरराव कदम, दत्तात्रय जाधव, मुकुंदराव मगर, संतोषराव लाडणे, गजानन धाडूळ आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेचे काम पिठासीन अधिकारी अरुणा संगेवार यांनी पार पाडले. त्यांना तहसीलदार पांडुरंग माचवे व गटविकास अधिकारी एस. आर. कांबळे यांनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande