
मुंबई, १० मार्च (हिं.स.) - जनतेच्या जिव्हाळ्याचे आणि प्रलंबित असलेले प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडता यावेत, यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात महत्त्वपूर्ण पालट करण्यात आला आहे. सर्वपक्षीय १७० आमदारांनी केलेल्या मागणीची नोंद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता प्रतिदिन पाच लक्षवेधी सूचना घेण्याचा निर्णय दिला आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रश्न छोटे असले, तरी ते अत्यंत महत्त्वाचे असतात. अनेक दिवसांपासून रखडलेले हे प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्याने आता प्रशासन ते मार्गी लावेल. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींना खर्या अर्थाने न्याय मिळाला आहे. यापूर्वी लक्षवेधींची संख्या मर्यादित असल्याने अनेक मतदारसंघांतील जनहितार्थ विषय मांडता येत नव्हते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी