
परभणी, 10 मार्च (हिं.स.)।
सेलू पंचायत समितीच्या सभापतीपदी कुपटा गणातून निवडून आलेल्या सौ. विजयमाला ग्यानोजी ढोंबे तर उपसभापतीपदी बोरकिणी गणातून निवडून आलेल्या सौ. सुलभाबाई ज्ञानोबा घुगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणूक प्रक्रियेचे काम पिठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव यांनी पार पाडले. निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी भाजपा सेलूचे आजी-माजी पदाधिकारी, बूथ प्रमुख, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विजयमाला ढोंबे व सुलभाबाई घुगे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पप्पू ढोंबे यांचेही कार्यकर्त्यांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis