नाशिकमध्ये अपघाताक पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
नाशिक, 11 मार्च (हिं.स.) : कवटाची फळे घेऊन नाशिककडे विक्रीसाठी येणाऱ्या छोटा हत्ती (मालवाहू टेम्पो) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना आडगाव शिवारात 11 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमार
अपघात लोगो


नाशिक, 11 मार्च (हिं.स.) : कवटाची फळे घेऊन नाशिककडे विक्रीसाठी येणाऱ्या छोटा हत्ती (मालवाहू टेम्पो) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना आडगाव शिवारात 11 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी छोटू भावसिंग पवार (रा. वटार, ता. बागलाण) यांचा भाऊ देवीदास भावसिंग पवार, त्यांची भाऊजई विमल देवीदास पवार आणि त्यांचा नातू आशिष व चिंतामण हे चार जण महिंद्रा कंपनीच्या एम.एच.४१ ए. यु. ७६५८ या क्रमांकाच्या छोटा हत्ती वाहनाने वटार येथून कवटाची फळे घेऊन नाशिककडे येत होते.

मुंबई-आग्रा महामार्गावर आडगावजवळ येताच वाहन चालक विनोद अरूण पवार याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात फिर्यादीचा भाऊ देवीदास पवार जागीच ठार झाला, तर त्यांची वहिनी विमलबाई पवार गंभीर जखमी झाली.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अहिरे करत आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande