अकोट रेल्वे स्थानकावर मारहाणीची घटना ; व्हिडिओ व्हायरल
अकोला, 11 मार्च (हिं.स.)। करोडो रुपये खर्च करून उभारलेले अकोट रेल्वे स्टेशन सध्या असुरक्षिततेचे केंद्र बनत चालले आहे. नुकताच अकोट स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला काही लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सो
Photo


अकोला, 11 मार्च (हिं.स.)। करोडो रुपये खर्च करून उभारलेले अकोट रेल्वे स्टेशन सध्या असुरक्षिततेचे केंद्र बनत चालले आहे. नुकताच अकोट स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला काही लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत.

रेल्वे स्थानकावर ना सुरक्षारक्षकांचे कार्यालय आहे, ना पोलिसांची गस्त. मागील काही दिवसांपासून येथे पेट्रोलिंग होत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. भरदुपारी प्लॅटफॉर्मवर असा मारहाणीचा प्रकार घडत असेल, तर रात्रीच्या वेळी सामान्य प्रवाशांनी कुणाच्या भरवशावर प्रवास करायचा? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.या व्हायरल व्हिडिओनंतर तरी आरपीएफ (दमरे अकोला) आणि जीआरपी झोपेतून जागी होणार का? रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष अकोट स्थानकावर जाऊन, हा प्रकार नक्की कधी घडला याची तेथील रिक्षाचालक किंवा प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी केल्यास, या मारहाणीचा आणि येथील गैरप्रकारांचा पर्दाफाश होऊ शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande