अकोला महानगरपालिकेच्या 31 शाळांचे सोशल ऑडिट पूर्ण
अकोला, 11 मार्च, (हिं.स.)। सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता विभाग, मुंबई यांच्या प्रभारी प्रविण वि. इंगळे (सोशल ऑडिटर) यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिका अधिनस्थ 31 शाळांचे सोशल ऑडिटचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या 15
Photo


अकोला, 11 मार्च, (हिं.स.)। सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता विभाग, मुंबई यांच्या प्रभारी प्रविण वि. इंगळे (सोशल ऑडिटर) यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिका अधिनस्थ 31 शाळांचे सोशल ऑडिटचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या 15 पथकांनी परिश्रमपूर्वक कार्य केले. सोशल ऑडिटचा व्यापक व्याप्तीया ऑडिटमध्ये शालेय इमारती व भौतिक सुविधांची स्थिती, शासकीय योजना, शैक्षणिक गुणवत्ता, शालेय परिसर, शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य, सामाजिक सहभाग, 'माझी विद्यार्थी संघ', विद्यार्थी सुरक्षा विषयक बाबी, पोषण आहार शिजवण्याची ठिकाणे आणि तेथील स्वच्छता विषयक बाबी ,ऑनलाइन पोर्टलावरील कामकाज तसेच शालेय पोषण आहाराचा दर्जा यांचा समावेश होता. यासाठी प्रत्यक्ष किचन शेडला भेटी देऊन तपासणी करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने आणि उपायुक्त विकास विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सोशल ऑडिट पार पडले. यापूर्वी, दि. 4 मार्च 2026 रोजी शिक्षणाधिकारी हरीशचंद्र इटकर आणि सहायक कार्यक्रम अधिकारी हबीब यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी तातडीची 4 तासांची कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत सोशल ऑडिटचे राज्य समन्वयक प्रविण इंगळे आणि शिक्षणाधिकारी हरीशचंद्र इटकर यांनी 210 प्रश्नांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे ऑडिटचे काम कालमर्यादेत पूर्ण होण्यास चांगली मदत झाली. या दरम्यान शिक्षणाधिकारी व सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन ऑडिटच्या कामाचा मागोवा घेतला. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका शाळांपासून करण्यात आली असून, याचे पूर्ण श्रेय शिक्षणाधिकारी हरीशचंद्र इटकर आणि सहायक कार्यक्रम अधिकारी हबीब शहीदी यांना जाते.

या कार्यक्रमाला अन्वर हुसेन (शां पीओ, समन्वयक), संजय खराटे, मुख्याध्यापक अब्दुल अजीज, राजू भिरड, जहुर अहमद, राजू अवधूत, गजेंद्र ढवळे, अर्जुन हिंगमिरे, खान अनिस खान, तसेच समग्र शिक्षा अभियान टीममधील वैशाली शेंडे, विकास उके, उमेश सोनोने, लीना रामटेके आणि कविता शर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शासनाच्या आदेशानुसार हे सोशल ऑडिट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असून, अकोल्यातील यशस्वी अंमलबजावणीमुळे पारदर्शकता व जबाबदारी वाढेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande