चिपळूणला गुरुवारी “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रम
रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन – महिला डॉक्टर्स विंग (IMA WDW) महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” या राज्यस्तर
चिपळूणला गुरुवारी “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रम


रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन – महिला डॉक्टर्स विंग (IMA WDW) महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” या राज्यस्तरीय जनजागृती व सन्मान सोहळ्याचे आयोजन गुरुवारी, दि. १२ मार्च रोजी चिपळूणला करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.

डिजिटल युगात महिलांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे, त्यांच्यात डिजिटल सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन, IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर्स राज्यस्तरीय हेल्पलाइनचा प्रारंभ, आरोही नारी गौरव पुरस्कार प्रदान, छावा या विशेष सांस्कृतिक सादरीकरणासह डिजिटल जागर जनजागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमास मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन IMA महिला डॉक्टर्स विंग महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande