
नाशिक, 11 मार्च (हिं.स.)। इराणच्या विरोधात पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या युद्धाचा झळा नाशिक शहराला देखील बसल्या आहेत. शहरातील अनेक छोटे व्यवसायिकांचे दुकान हे बुधवारी उघडू शकले नाही त्यामुळे छोट्या गाड्या चालवणाऱ्या व्यावसायिकांची उपासमार सुरू झाली आहे.
मागील अकरा दिवसापासून अमेरिका इजराइल आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा आता संपूर्ण देशाबरोबरच नाशिक शहरातही जाणवू लागला आहे. केंद्र सरकारने गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विविध पर्याय सुरू केले असले तरी नाशिक शहरांमध्ये याचा परिणाम हा बुधवारी दिसून आला. शहरातील चहा वडापाव तसेच अन्न छोटा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना याचा फटका बसल्याचे जाणविले आहे. शहरात रोज सकाळी अनेक चौकांमध्ये सुरू होणाऱ्या चहा व खाद्यपदार्थांच्या गाड्या या सुरू होऊ शकला नाही कारण गॅस सिलेंडरची उपलब्धता न झाल्यामुळे हा परिणाम झाल्याचे या व्यवसायातील व्यवसायिकांनी सांगितले सिलेंडर मिळत नाही आणि घरगुती सिलेंडर लावलं तर कारवाई होते त्या पद्धतीने निरोप ही व्यवसायिकांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आता आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहे जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भरारी पथक स्थापन झाले असले तरी या पथकाचा कारवाईला सामोरे न जाण्याबाबतच्या कल या छोट्या व्यवसायिकांमध्ये दिसून आलेला आहे त्यामुळे धंदा बंद ठेवलेला बरा अशी परिस्थिती या व्यवसायिकांमध्ये निर्माण झालेली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV