
परभणी, 11 मार्च (हिं.स.)। सोनपेठ शहरातील नागरिकांनी आपल्या मतदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि मतदार यादीतील अचूकतेसाठी आपल्या प्रभागातील बीएलओशी संपर्क साधून मॅपिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अ. वि. महाराष्ट्र यांनी केले आहे.
प्रशासकीय कामांतर्गत मतदार यादीचे अद्ययावतीकरण आणि मॅपिंगची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनेकदा मतदार यादीत पत्ता किंवा प्रभागाची माहिती अस्पष्ट असल्याने मतदारांना मतदानाच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागतो,हे टाळण्यासाठी मतदारांनी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या उत्सवात आपले मत महत्त्वाचे आहे. मतदार यादीत आपले नाव योग्य ठिकाणी असणे आणि त्याचे मॅपिंग होणे ही तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः तरुण मतदारांनी, आपापल्या भागातील नियुक्त बीएलओची भेट घ्यावी आणि आपले मॅपिंग करून घ्यावे, भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या प्रभागासाठी नियुक्त असलेल्या बीएलओ यांच्याशी संपर्क साधुन. मॅपिंग करून घ्यावी असे आवाहन खदीरबापु विटेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis