छगन भुजबळांच्या मतदारसंघात 'अंधार'; थकबाकीमुळे शासकीय कार्यालयांची वीज खंडित
येवला, 11 मार्च (हिं.स.)। नाशिक जिल्ह्याचे दिग्गज नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा संरक्षण मंत्री छगन भुजबळ व येवल्याचे आमदार यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवला शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क
छगन भुजबळांच्या मतदारसंघात 'अंधार'; थकबाकीमुळे शासकीय कार्यालयांची वीज खंडित


येवला, 11 मार्च (हिं.स.)। नाशिक जिल्ह्याचे दिग्गज नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा संरक्षण मंत्री छगन भुजबळ व येवल्याचे आमदार यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवला शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे वीज बिल न भरल्याने महाराष्ट्र वीज मंडळाने (MSEB) धडक कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे शासकीय कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या कार्यालयात या परिसरात सुमारे 36 लाईटचे पोल आहे. शासकीय कार्यालयीन तसेच विश्रामगृह येथे लाईट नसल्या कारणाने येथे पिण्याचे पाणी देखील मिळणे कठीण झाले आहे. शासकीय विश्रामगृह परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येवला शहरातील ऐतिहासिक आणि विस्तीर्ण अशा सहा एकर परिसरात शासकीय विश्रामगृह पसरलेले आहे. याच परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ आणि २ अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून या कार्यालयांचे वीज बिल थकल्याने वीज मंडळाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे साधारण ७० हजार रुपये बिल थकीत असल्याचा दुजोरा वीज कार्यालयाचे संबंधित अधिकारी यांनी माहिती दिली. गेल्या एक वर्षापासून हे बिल भरले गेले नसल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी वीज कापल्या गेल्यामुळे कार्यालयातील संगणकीय इतर तांत्रिक कामे ठप्प झाली आहेत.

नियम सर्वांसाठी सारखाच सामान्य नागरिकाने बिल थकवल्यास तात्काळ वीज कापली जाते, मग शासकीय कार्यालयांना सवलत का? असा प्रश्न उपस्थित करत येवला शहर वीज मंडळाने ही कारवाई केली आहे.एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधींच्या विकासकामांचा धडाका सुरू असताना, दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातील मुख्य शासकीय कार्यालयाची वीज ७० हजार रुपयांसाठी कापली जाणे, हा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande