नांदेड - खंडेराय परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
नांदेड, 11 मार्च (हिं.स.)। सध्या इस्लाम धर्मातील रमजान हा सण मुस्लिम समुदायांमध्ये एक महत्त्वाची पर्वणी म्हणून ओळखला जातो. रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा पवित्र नवा महिना आहे जो प्रेषित मुहम्मद यांच्यावर कुराण अवतरल्याची आठवण म्हणून उपवास (रोजा) प्र
नांदेड - खंडेराय परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन


नांदेड, 11 मार्च (हिं.स.)। सध्या इस्लाम धर्मातील रमजान हा सण मुस्लिम समुदायांमध्ये एक महत्त्वाची पर्वणी म्हणून ओळखला जातो. रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा पवित्र नवा महिना आहे जो प्रेषित मुहम्मद यांच्यावर कुराण अवतरल्याची आठवण म्हणून उपवास (रोजा) प्रार्थना आणि दानासह साजरा केला जातो. सुमारे ६१० ईसवी मध्ये 'लैलत-उल-कद्र' (अदभुत रात्र) प्रसंगी पवित्र कुराण शरीफ अवतरली तेव्हा पासून हा महिना पाळला जातो. मुस्लिम मान्यतानुसार रमजानच्या पवित्र महिन्यातच अल्लाहने आपला पवित्र ग्रंथ 'कुराण' प्रेषित मुहम्मद यांना मानवी कल्याणासाठी प्रदान केला. हिजरी संवताच्या दुसऱ्या वर्षी (2AH) अल्लाहच्या आदेशानुसार मुस्लिमांवर रमजानचे रोजे (उपवास) फर्ज (अनिवार्य) करण्यात आले.

रमजान' हा शब्द अरबी भाषेतील 'रमदा' (Ramia) शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ 'उष्ण दगड' किंवा 'पावसाची सुरुवात' असा होतो. जो उपवासामुळे पापे जळून खाक करतो अशी मान्यता आहे. हा महिना रहमत (दया) बरकत (आशीर्वाद) आणि आत्मसंयमाचा काळ मानला जातो. या काळात पहाटे (सहरी) पासून ते सूर्यास्तापर्यंत (इफ्तार) अन्न आणि पाण्याचा त्याग करून कठोर उपवास पाळला जातो. महिनाअखेरीस नवीन चंद्रकोर दिसल्यावर रमजानची सांगता होते आणि 'ईद-उल-फित्र' हा सण साजरा केला जातो. रमजानचा इतिहास हा केवळ अन्नापासून दूर राहणे नसून मनाला शांती शिस्त आणि गरिबां बद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा एक धार्मिक संस्कार आहे. या महिन्यामध्ये मुस्लिम धर्मातील लोक दिवसभर अन्न पाणी त्यागून कठोर उपवास करून आपल्या ईश्वराच्या नामचिंतनातच आपला दिवस घालवतात.

या महिन्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून या महिन्यांमध्ये रमजान निमित्त वेगवेगळी उपक्रम राबवली जातात. अशा पद्धतीचे बिलोली शहरातील खंडेराय परिवार व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुभाष खंडेराव यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचे बिलोली येथील मोठी मस्जिद परिसर येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी मुस्लिम व हिन्दू समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, माजी नगरसेवक किशन पटाईत, माधव जाधव तलाठी, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुभाष खंडेराय, माजी नगराध्यक्ष रणवीरसिंह चौहान, आदी मुस्लिम व हिंदू समाजातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande