नांदेड - चौथे जनहित राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात
नांदेड, 11 मार्च (हिं.स.)। राजकारण्यांना सामाजिक भान येण्याची गरज असून युवकांच्या हाताला काम नाही बेरोजगारीचे प्रमाण वाढले. स्व. शंकरराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयात मोठमोठी धरणे बांधून शेती आणि ग्रामीण भागातील जनतेच्य
नांदेड - चौथे जनहित राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात


नांदेड, 11 मार्च (हिं.स.)। राजकारण्यांना सामाजिक भान येण्याची गरज असून युवकांच्या हाताला काम नाही बेरोजगारीचे प्रमाण वाढले. स्व. शंकरराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयात मोठमोठी धरणे बांधून शेती आणि ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला त्यामुळे सर्वत्र शेतीला पाणी मिळत आहे आणि त्यातून ग्रामीण जनतेचं जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. परंतू मराठवाड्यात अजून म्हणावी तशी औद्योगिक क्रांती झाली नाहीं त्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी, मराठवाड्यातील बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी राज्यकर्त्यांनी औद्योगिक क्रांती करण्याची आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे यांनी केले.

तालुक्यातील दत्तात्रय मठ संस्थान मोहनपुरा येथे राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) ता. लोहा जि. नांदेड च्या वतीने चौथे जनहित राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रा. डॉ. ललिता शिंदे, बोकारे बोलत होत्या. यावेळी भास्कर चंदनशिव विचार मंचावर मठाधिपती 1008 राम भारती महाराज, उदघाटक ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, प्राचार्य डॉ. अशोक गवते पाटील, कवी, कादंबरीकार प्रा. महेश मोरे, माजी संमेलनाध्यक्ष ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ, ज्येष्ठ कवी शंकर वाडेवाले, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती विठ्ठल वाघ, जुक्टाचे सल्लागार मुकुंद बोकारे, स्वागताध्यक्ष वाहेगावचे सरपंच शंकरराव सोनटक्के, निमंत्रक दिलीप कंधारे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दत्तात्रय महाराज, रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा

फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करुन करण्यात आली.

पुढे बोलताना प्रा.ललिता शिंदे म्हणाल्या की, मराठवाड्यातील युवक मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊनही बेरोजगार झाले असून रोजगारासाठी ते पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी महानगरामधील कंपन्यांमध्ये जाऊन मिळेल ते काम करत आहेत हे थांबविण्यासाठी आमच्या राजकीय सत्ताधारी मंडळीनी सामाजिक भान ठेवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंपन्या, कारखाने काढून युवकांना रोजगार देण्याच नियोजन लावावे तसेच युवकांनी मोबाईलमधून बाहेर पडून, वाईट व्यसनापासून दूर होऊन छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचाचारांचे पाईक व्हावे आणि सन्मार्गाने जीवन जगावे त्यामुळे आपला परिसर सुजलाम, सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही असे संमेलनाध्यक्षा म्हणाल्या. सुरुवातीला उदघाटक ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, प्राचार्य अशोक गवते पाटील, कवी प्रा. महेश मोरे, माजी संमेलनाध्यक्ष ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांनी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आवश्यक्तेबद्दल सविस्तर विचार मांडले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande