रत्नागिरी : चिपळूणला १७ मार्च रोजी पंतप्रधान शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : चिपळूण येथील भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मंगळवारी, दि. १७ मार्च रोजी पंतप्रधान शिकाऊ उमेदवारी (PMNAM) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध व्यवसाय उत्तीर्ण झाल
रत्नागिरी : चिपळूणला १७ मार्च रोजी पंतप्रधान शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा


रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : चिपळूण येथील भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मंगळवारी, दि. १७ मार्च रोजी पंतप्रधान शिकाऊ उमेदवारी (PMNAM) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध व्यवसाय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना शिकाऊ उमेदवारीची संधी मिळावी म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कान्हे, ता.चिपळूण यांनी केले आहे.

मेळाव्यासाठी जिल्ह्यातील विविध आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande