नांदेड ते देगलूर दरम्यान प्रस्तावित ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाला गती
नांदेड, 11 मार्च (हिं.स.) नांदेड ते देगलूर दरम्यान प्रस्तावित ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाला गती मिळत असून या मार्गामुळे जिल्ह्यातील अनेक गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. अकोला-हैदराबाद मुख्य मार्गाशी जोडला जाणारा हा नवीन महामार्ग वा
नांदेड ते देगलूर दरम्यान प्रस्तावित ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाला गती


नांदेड, 11 मार्च (हिं.स.) नांदेड ते देगलूर दरम्यान प्रस्तावित ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाला गती मिळत असून या मार्गामुळे जिल्ह्यातील अनेक गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. अकोला-हैदराबाद मुख्य मार्गाशी जोडला जाणारा हा नवीन महामार्ग वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. प्रस्तावित मार्ग नांदेड परिसरातून पुढे तुप्पा, वाळकी, कापसी गुम्फा, कहाळा, मांडणी, सोमठाणा, हिप्परगा, रानसुगाव, लालवंडी, गोळेगाव, बेंद्री, खंडगाव, होटाळा, कांडाळा, शेळगाव गौरी आणि टाकळी या गावांमधून जाणार असल्याची माहिती समोर आली.

आहे. या मार्गामुळे ग्रामीण भागाला थेट राष्ट्रीय महामार्गाची जोड मिळणार असल्याने शेतीमालाची वाहतूक, व्यापार आणि औद्योगिक हालचालींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या नांदेड-देगलूर मार्गावर वाहतुकीचा ताण वाढत असून अपघातांची संख्याही वाढत आहे. ग्रीन फिल्ड महामार्ग उभारला गेल्यास वाहतूक सुरळीत होऊन प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.

तसेच अकोला-हैदराबाद या महत्त्वाच्या मार्गाशी जोडणी झाल्याने मराठवाडा आणि तेलंगणा दरम्यान व्यापार आणि प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

या महामार्गामुळे मार्गावरील गावांमध्ये पायाभूत सुविधा, लघुउद्योग आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून लवकरच पुढील टप्प्यांवर कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande