विदर्भात शुक्रवारपासून हलका ते मध्यम पाऊस
अमरावती, 11 मार्च (हिं.स.)। उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तविला आहे. येत्या शुक्रवारपासून विदर्भावर ढग दाटण्यास सुरुवात होईल आणि वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात गेल्या १
शुक्रवारपासून विदर्भावर पावसाचे ढग दाटणार वैदर्भियांसाठी हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज


अमरावती, 11 मार्च (हिं.स.)। उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तविला आहे. येत्या शुक्रवारपासून विदर्भावर ढग दाटण्यास सुरुवात होईल आणि वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात गेल्या १० दिवसांपासून कमाल तापमानातील चढउतारामुळे नागरिकांची परीक्षा सुरू आहे. बहुतेक जिल्हे उन्हाच्या झळांनी त्रस्त आहेत. तीन दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेले अकोल्याचे तापमान अद्यापही जास्त आहे. बुधवारी अकोल्यात ४१ अंश तापमान नोंदवण्यात आले, तर अमरावतीत ४०.४ अंश आहे. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीतही तापमान ४० अंशापर्यंत गेले आहे. नागपूरमध्ये तापमान ३८.४ अंश नोंदवण्यात आले, जे सरासरीपेक्षा ३.२ अंश अधिक आहे. चंद्रपूर ३८.२ अंश, तर वर्धा, वाशिम आणि बुलढाणा ३९ सेल्सीअस सरासरीत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारपर्यंत तापमान वाढलेले राहील आणि उष्ण लाटेचा सामना करावा लागेल.

शुक्रवारपासून हवामान बदल:

शुक्रवारपासून आकाशात ढग दाटण्याची शक्यता

३५–५० किमी/तास वेगाने वादळी वारे

हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस

पावसाळी वातावरणामुळे शनिवार १४ मार्चपासून कमाल तापमान ३–५ अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भवासीयांना उष्ण लाटेपासून मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज अमरावती कृषी विभागाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande