रेल्वे रुळ ओलांडणे भोवले, आरोग्य विभागाच्या तिघांवर कारवाई!
अकोला, 12 मार्च (हिं.स.)। अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील तीन कर्मचारी रेल्वे नियम मोडताना रेल्वे सुरक्षा बलाच्या तावडीत सापडले आहेत. लाईन क्रॉस करताना या तिघांना RPF ने ताब्यात घेतल्याची घटना
Photo


अकोला, 12 मार्च (हिं.स.)।

अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील तीन कर्मचारी रेल्वे नियम मोडताना रेल्वे सुरक्षा बलाच्या तावडीत सापडले आहेत. लाईन क्रॉस करताना या तिघांना RPF ने ताब्यात घेतल्याची घटना मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर घडली आहे.

अकोल्यावरून मूर्तिजापूर येथे दररोज अप-डाऊन करणाऱ्या श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना आज नियम मोडणे महागात पडले. सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेसमधून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर घाईगडबडीत या तिघांनी अधिकृत पुलाचा वापर न करता थेट रेल्वे लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न केला.

याच वेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना रंगेहात पकडले. रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, हे कर्मचारी अकोल्यावरून मूर्तिजापूर येथे दररोज अप-डाऊन करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हे कर्मचारी वारंवार आपल्या कामावर उशिरा येत असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. आजच्या या कारवाईमुळे ते उशिरा पोहोचत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, रेल्वे लाईन क्रॉस करणे हा गंभीर गुन्हा असल्याचेही सांगितले आहे. नियम मोडणाऱ्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande