नागपुरात ‘श्री गजानन विजय’ बोलणाऱ्या ग्रंथाचे रविवारी लोकार्पण
नागपूर, 12 मार्च (हिं.स.) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारिक जगातील पहिला बोलणारा श्री गजानन विजय ग्रंथ तयार करण्यात आलाय. या ग्रंथांचे रविवारी 15 मार्च रोजी गडकरींच्या हस्ते लोकार्पण
पत्रकार परिषदेत माहिती देताना गिरीश देशमुख सोबत इतर मान्यवर


नागपूर, 12 मार्च (हिं.स.) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारिक जगातील पहिला बोलणारा श्री गजानन विजय ग्रंथ तयार करण्यात आलाय. या ग्रंथांचे रविवारी 15 मार्च रोजी गडकरींच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती गिरीश देशमुख यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी देशमुख यांनी सांगितले की, नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृह रविवारी 15 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पापमोचनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित सोहळ्यात नितीन गडकरींच्या हस्ते या ग्रंथाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईतील उद्योगपती मा. श्री. जयंत म्हैसकर, संतनगरी शेगाव येथील. शैलेंद्र महादेव (गणेश) पाटील, जेजुरी खंडोबा देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मंगेश घोणे, डोंबिवली येथील विद्या पडवळ उपस्थित राहणार आहेत. श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील कोट्यवधी भक्तांचे आद्यात्मिक दैवत आहेत. त्यांच्या जीवनातील चमत्कारिक लीला, आध्यात्मिक संदेश आणि भक्तांवरील कृपा अनेक पिढ्यांना प्रेरणा देते. नव्या पिढीपर्यंत हे संदेश आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी ‘राजराजेश्वरी’ बोलणारा ग्रंथ तयार करण्यात आला आहे.

ग्रंथाचे वैशिष्ट्य:

५०० पानांचा भव्य व आकर्षक ग्रंथ

गजानन वीणा या यंत्राद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजीत ऐकण्याची सुविधा

२१ अध्याय सुरेल धूनमध्ये संगीतबद्ध

प्रत्येक अध्यायास प्रारंभिक २१ भक्तिमय भजने

महाराजांच्या लीलांचे दर्शन देणारी सुमारे २५० चित्रे

सोप्या भाषेत अध्यायांचे निरूपण

मोबाईल ऍपद्वारे कुठेही व कधीही ऐकण्याची सुविधा

ग्रंथाची निर्मिती इंस्टाग्रोथ मर्चेंडाइज एलएलपी द्वारे केली गेली. संजय जैन, गिरीश देशमुख, अमर इंदुरकर, उमेश महाजन यांचा विशेष सहभाग होता. लेखन व क्रिएटिव्ह डायरेक्शन श्याम पेठकर व भाग्यश्री पेठकर यांनी केले, संगीत विरेंद्र लाटणकर यांचे, संगीत नियोजन पवन तिवारी यांनी केले.

सुरेश भट सभागृहात उपस्थित गजानन भक्तांसाठी विशेष योजना आखण्यात आली आहे, ज्यात पाच भाग्यवान भक्तांना ईश्वर चिट्ठी द्वारे ग्रंथ महाराजांचा प्रसाद म्हणून भेट देण्यात येणार आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande