विरोधकांना कमी लेखू नका; विधीमंडळातील कामकाजाकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई !
* भाजप प्रदेशाध्यक्षांचा स्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट इशारा ! मुंबई, 12 मार्च (हिं.स.) - विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात भाजपचे आमदार आणि मंत्री यांची सभागृहातील उपस्थिती कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर विषयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष
बैठक


* भाजप प्रदेशाध्यक्षांचा स्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट इशारा !

मुंबई, 12 मार्च (हिं.स.) - विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात भाजपचे आमदार आणि मंत्री यांची सभागृहातील उपस्थिती कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर विषयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली असून स्वपक्षीय ‘दांडी’ मारणार्‍या लोकप्रतिनिधींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘विरोधकांना अल्प लेखून निष्काळजीपणे वागू नका आणि सभागृहाचे कामकाज गांभीर्याने घ्या’, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. भाजपच्या या निर्णयामुळे आता विधीमंडळाच्या कामकाजाकडे लोकप्रतिनिधींना अधिक गांभीर्याने पहावे लागणार आहे.

अनुपस्थित राहणार्‍यांचे ‘प्रगती पुस्तक’ तयार !

विधीमंडळात वारंवार अनुपस्थित रहाणार्‍या सदस्यांची यादी आणि त्यांचे ‘प्रगती पुस्तक’ (रिपोर्ट कार्ड) तयार करण्यात आले असून ते संबंधितांच्या हातात देण्यात आले आहे. यापुढे कोणताही आमदार किंवा मंत्री सभागृहात अनुपस्थित रहाणार असेल, तर त्याला त्याचे लेखी कारण पक्षाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनाकारण अनुपस्थित रहाणार्‍यांवर पक्षीय स्तरावर कारवाई करण्याचा इशाराही प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

आमदार आणि मंत्री यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाने आता नवीन शिस्त लागू केली आहे. सभागृहात ५ आमदारांचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्यातील एका आमदाराकडे उपस्थिती आणि कामकाज यांतील सहभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा प्रमुख आमदार आपल्या गटातील सदस्य सभागृहात किती वेळ उपस्थित रहातात आणि किती सक्रिय असतात, याचा अहवाल थेट प्रदेशाध्यक्षांकडे देणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः मंत्र्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष ठेवणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande