जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा
रायगड, 12 मार्च (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील बीड परिसरात किरकोळ वादातून झालेल्या भांडणाने गंभीर वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही जणांनी एका व्यक्तीवर दगड व चाकूने हल्ला करत त्याच्या कुटुंबीयांनाही मारहाण केल्याची
Bloody attack over old dispute; Four people charged


रायगड, 12 मार्च (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील बीड परिसरात किरकोळ वादातून झालेल्या भांडणाने गंभीर वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही जणांनी एका व्यक्तीवर दगड व चाकूने हल्ला करत त्याच्या कुटुंबीयांनाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड, कर्जत येथे फिर्यादी यांचा मुलगा घरासमोर खेळत होता. त्यावेळी फिर्यादी यांची मुलगी तेथे उभी असताना मागील भांडणाचा राग मनात धरून महिला आरोपी क्रमांक ३ हिने अचानक हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ सुरू केली.

घडलेला प्रकार पाहून फिर्यादी व त्यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी पुढे गेले. मात्र त्यावेळी आरोपी क्रमांक १ व २ यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना दुखापत केली. एवढ्यावरच न थांबता मोटारसायकलच्या चावीला असलेल्या छोट्या चाकूने फिर्यादी यांच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी क्रमांक ३ व ४ यांनी फिर्यादी यांच्या पत्नी व मुलींनाही हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande