रायगड - रामवाडी येथे एसटी नादुरुस्त; प्रवाशांच्या गोंधळात दागिन्यांची चोरी
रायगड, 12 मार्च (हिं.स.)। श्रीवर्धन ते डोंबिवली दरम्यान एसटी बसने प्रवास करत असताना एका महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही
ST train malfunctions at Ramwadi; Jewelry stolen amid commuter chaos


रायगड, 12 मार्च (हिं.स.)। श्रीवर्धन ते डोंबिवली दरम्यान एसटी बसने प्रवास करत असताना एका महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. फिर्यादी महिला या श्रीवर्धन बसस्थानकातून डोंबिवली बसस्थानकाकडे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने आपल्या बहिणीसोबत प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची एक डबी कपड्यांच्या बॅगेत ठेवून ती बॅग बसमधील सीटच्या वर असलेल्या सामान ठेवण्याच्या स्टँडवर ठेवली होती.

दरम्यान, सदर एसटी बस रामवाडी बसस्टॉप, पेण येथे आल्यानंतर ती नादुरुस्त झाल्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची डबी चोरी करून नेल्याचे समोर आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे ५५ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार म्हात्रे पवार करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande