चंद्रपूर : कारागृहात दिव्यांग कलावंतांनी सादर केला संगीतमय कार्यक्रम
चंद्रपूर, 12 मार्च (हिं.स.)। कारागृहातील गुन्हेगारांच्या विचारसरणीत व वर्तणुकीत सुधारणा करून समाजात त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन करण्याकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा कारागृ
चंद्रपूर : कारागृहात दिव्यांग कलावंतांनी सादर केला संगीतमय कार्यक्रम


चंद्रपूर, 12 मार्च (हिं.स.)। कारागृहातील गुन्हेगारांच्या विचारसरणीत व वर्तणुकीत सुधारणा करून समाजात त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन करण्याकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा कारागृहात महारोगी सेवा समिती, आनंदवन येथील दिव्यांग कुष्ठमुक्त कलावंतांचा 'स्वरानंदवन वाद्यवृंद' कार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे, ऑर्केस्ट्राचे प्रमुख व्यवस्थापक सदाशिव ताजने, अंतर्गत व्यवस्थापन समिती सदस्य सुधाकर कडु, राजेश ताजने, आनंदवनचे प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ‘जय मा सरस्वती’ या गीताने झाली. सति व निशा यांनी ‘सूया घे गं दाभन घे’ हे गीत सादर करून बंद्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यावेळी विविध हिंदी चित्रपटांची गाणीसुध्दा सादर करण्यात आली. निशा, उज्वला, सुषमा, बैनाबाई आदी दिव्यांग कलावंतांनी हिंदी, मराठी, तेलगु भाषेतील उत्कृष्ट गीत व नृत्य सादर करून उपस्थित बंदी बांधवांचे मन जिकंले. तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गीत सादर करून कारागृहातील बंद्याना भक्ती गीतामध्ये तल्लीन केले. यावेळी तुरुंगाधिकारी श्रेणी-1 यांनी कमलाकर मिराशे यांनी ‘मागतो मी पांडुरंगा हेची एक दान’ हे गीत गायन केले.

कार्यक्रमाचे संचालन संजीव हटवादे व श्रीमती शमा पठाण यांनी केले. यावेळी कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतिश सोनवणे, कमलाकर मिराशे, मिलींद बनसोड, प्रकाश लोमटे, संजीव हटवादे, शिक्षक रविंद्र वांढरे, विजय माल्टे, सुभेदार महेंद्र हिरोळे, सत्यानंद दुबे, शिवशंकर खंडारे, नरेंद्र दशमवार, गुणवंत लखदिवे, स्वप्निल भोयर, परेश जगनाडे, मोहनिश महादुले, स्वाती शहारे, कोमल बिरादार, प्रिया तलांडे, अश्विनी तुराणकर, मिना मडावी व इतर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande