एनएसईच्या आयपीओसाठी देश-विदेशातील दिग्गज कंपन्यांची फौज
मुंबई, 12 मार्च (हिं.स.) - नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) प्रस्तावित आयपीओ (Initial Public Offering) साठी देश-विदेशातील आघाडीच्या वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांची फौज सज्ज झाली आहे. एनएसईने आयपीओ प्रक्रियेसाठी मर्चंट बँकर्स, कायदेविषयक सल्लागार
NSE


मुंबई, 12 मार्च (हिं.स.) - नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) प्रस्तावित आयपीओ (Initial Public Offering) साठी देश-विदेशातील आघाडीच्या वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांची फौज सज्ज झाली आहे. एनएसईने आयपीओ प्रक्रियेसाठी मर्चंट बँकर्स, कायदेविषयक सल्लागार आणि इतर मध्यस्थांची निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे.

एनएसईच्या आयपीओ समितीने मंजूर केलेल्या चौकटीनुसार ही निवड प्रक्रिया पारदर्शक आणि स्पर्धात्मक पद्धतीने पार पडली. आयपीओच्या तयारीत आता देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

20 मर्चंट बँकर्सची निवड

आयपीओ प्रक्रियेसाठी एकूण 20 मर्चंट बँकर्स निवडण्यात आले आहेत. यात Kotak Mahindra Capital, JM Financial, Axis Capital, IIFL Capital Services, Motilal Oswal Investment Advisors, ICICI Securities, SBI Capital Markets, Nuvama Wealth Management आणि HDFC Bank यांसारख्या भारतातील आघाडीच्या वित्तीय संस्थांचा समावेश आहे.

यासोबतच Morgan Stanley India, Citigroup Global Markets India, JP Morgan India आणि HSBC Securities & Capital Markets (India) यांसारख्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकाही या प्रक्रियेत सहभागी आहेत.

आघाडीच्या कायदेविषयक फर्म्सचीही नियुक्ती

आयपीओ प्रक्रियेसाठी Cyril Amarchand Mangaldas, Khaitan & Co, Latham & Watkins, Sidley Austin, AZB & Partners, S&R Associates, Shardul Amarchand Mangaldas आणि Trilegal या आठ आघाडीच्या कायदेविषयक फर्म्सची नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांचा सहभाग

आयपीओ प्रक्रियेसाठी MUFG Intime India, Makarand M Joshi & Company, Manian & Rao, RBSA Advisors, Concept Communication आणि Redseer Strategy Consultants यांसारख्या इतर कंपन्यांचीही निवड करण्यात आली आहे. या संस्था नियामक प्रक्रिया, ड्यू डिलिजन्स, कागदपत्रीकरण, मार्केटिंग आणि आयपीओ अंमलबजावणीमध्ये एनएसईला मदत करणार आहेत.

दरम्यान, या प्रक्रियेसाठी मध्यस्थांच्या निवड आणि नियुक्तीसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या Rothschild & Co India यांची भूमिका आता संपुष्टात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande