
मुंबई, 12 मार्च (हिं.स.)। महिंद्राने BE 6 ‘बॅटमॅन एडिशन’ पुन्हा बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. जगातील बॅटमॅन थीमवर आधारित व्यावसायिकरीत्या उपलब्ध असलेली ही पहिली SUV असल्याने तिच्या पहिल्या लाँचनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कन्झ्युमर प्रॉडक्ट्स यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या विशेष आवृत्तीची 999 गाड्यांची संपूर्ण लॉट केवळ 135 सेकंदांत विकली गेली होती. क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द डार्क नाईट ट्रिलॉजी’ पासून प्रेरित असलेली ही SUV आता कलेक्टर आयटम म्हणूनही लोकप्रिय झाली आहे. पहिल्या बुकिंग विंडोमध्ये गाडी मिळू न शकलेल्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरून महिंद्राला सतत मागणी केली होती. त्यामुळे चाहत्यांच्या या प्रतिसादानंतर कंपनीने BE 6 ‘बॅटमॅन एडिशन’ पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
याला प्रतिसाद देत महिंद्राने BE 6 ‘बॅटमॅन एडिशन’साठी बुकिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र ही संधी मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असणार आहे. पूर्वी विकल्या गेलेल्या 999 गाड्या या ‘बॅटमॅन एडिशन’च्या कहाणीचा पहिला अध्याय मानल्या जातात. तर आता पुन्हा उघडण्यात आलेली ही बुकिंग विंडो चाहत्यांना या खास ‘बॅटमॅन एडिशन’ अनुभवाचा भाग होण्याची मर्यादित संधी देणार आहे.
6 मार्च 2026 रोजी अॅड युअर प्रीफरन्स पर्याय mahindraelectricsuv.com वर सुरू
१० मार्च 2026, सकाळी 11:00 वाजता रोजी बुकिंगला सुरुवात (फक्त एक दिवसासाठी)
10 एप्रिल 2026 रोजी वाहनांच्या डिलिव्हरीला सुरुवात
BE 6 ‘बॅटमॅन एडिशन’ आधी खरेदी केलेल्या ग्राहकांच्या निष्ठेची दखल घेत सध्याच्या मालकांकडून रेफर केलेल्या बुकिंगना प्राधान्याने डिलिव्हरी दिली जाणार आहे.
आजच्या काळातील सर्वात प्रभावशाली सांस्कृतिक आयकॉनपैकी एक असलेल्या डीसीच्या ‘बॅटमॅन’ पासून प्रेरणा घेतलेली ही एसयूव्ही परफॉर्मन्स, डिझाइन आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा संगम सादर करते.
BE 6 ‘बॅटमॅन एडिशन’ ही BE 6 च्या टॉप-एंड ‘पॅक थ्री 79 kWh’ व्हेरिएंटवर आधारित आहे.
मुख्य डिझाइन वैशिष्ट्ये :
● कस्टम सॅटिन ब्लॅक रंग
● फ्रंट डोअर्सवर खास ‘बॅटमॅन’ डेकल
● R20 अलॉय व्हील्स – आक्रमक आणि अॅथलेटिक लुक
● अल्केमी गोल्ड रंगातील सस्पेन्शन आणि ब्रेक कॅलिपर्स – सॅटिन ब्लॅक बॉडीशी उठावदार आणि प्रीमियम कॉन्ट्रास्ट
● मागील बाजूस “BE 6 × दी डार्क नाइट” लिमिटेड एडिशन बॅजिंग
● ‘द डार्क नाईट ट्रिलॉजी’मधील बॅट चिन्ह (बॅट एम्ब्लेम) खालील ठिकाणी खास दिलेले आहे :
● हब कॅप्स
● फ्रंट क्वार्टर पॅनल्स
● रिअर बंपर
● विंडोज आणि रिअर विंडशील्ड
● इन्फिनिटी रूफ – ‘द डार्क नाईट ट्रिलॉजी’ बॅट चिन्हासह
● नाईट ट्रेल – कार्पेट लॅम्प्समध्ये बॅट चिन्हाचा लोगो प्रोजेक्शन
● रिअर डोअर क्लॅडिंगवर ‘बॅटमॅन एडिशन’ सिग्नेचर स्टिकर
इंटीरियर डिझाइन वैशिष्ट्ये :
● डॅशबोर्डवर ब्रश्ड अल्केमी गोल्ड ‘बॅटमॅन एडिशन’ प्लाक
● चारकोल लेदर इन्स्ट्रुमेंट पॅनल (IP) – ड्रायव्हर कॉकपिटभोवती ब्रश्ड गोल्ड हॅलो डिझाइन
● सुएड आणि लेदर अपहोल्स्ट्री – गोल्ड सेपिया अॅक्सेंट स्टिचिंगसह आणि ‘दी डार्क नाइट ट्रायोलॉजी’ बॅट चिन्हासह समृद्ध स्पर्शानुभव
● गोल्ड अॅक्सेंट असलेले स्टीयरिंग व्हील, ईन-टच कंट्रोलर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि कस्टम की फॉब – अल्केमी गोल्ड डिटेलिंगसह
● ‘दी डार्क नाइट ट्रायोलॉजी’ बॅट चिन्ह खालील ठिकाणी एम्बॉस केलेले आहे :
● “बूस्ट” बटण
● सीट्स
● इंटीरियर लेबल्स
● पॅसेंजर डॅशबोर्ड पॅनेलवर पिनस्ट्राइप ग्राफिक आणि ‘दी डार्क नाइट ट्रायोलॉजी’ बॅट चिन्ह
● रेस कार प्रेरित डोअर स्ट्रॅप्स – बॅटमॅन एडिशन ब्रँडिंगसह
● इन्फोटेनमेंट डिस्प्लेवर ‘बॅटमॅन एडिशन’ वेलकम अॅनिमेशन
● बॅटमॅन प्रेरित कस्टम एक्सटेरियर इंजिन साऊंड
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर