ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतिश वळसंगकर यांचे निधन
सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)। - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय स्वयंसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतिश वळसंगकर (वय ७२) यांचे गुरुवारी दुपारी १२ वाजता पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ
Fdf


सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)।

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय स्वयंसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतिश वळसंगकर (वय ७२) यांचे गुरुवारी दुपारी १२ वाजता पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. हरिभाई देवकरण प्रशाला तसेच सोलापूर जनता बँक यांसह अनेक संस्थांवर त्यांनी संचालक म्हणून कार्य केले होते.

गेल्या काही दिवसांपासून ते पुणे येथे मुलाकडे राहत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande