
सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)। गॅस सिलिंडर दरवाढ आणि टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला विरोध करत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅस मिळण्यात अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महागाईच्या थैमानाने सामान्य जनतेच्या जीवनावर झालेल्या परिणामाची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसने एक अनोखा आणि प्रभावी आंदोलन केले.काँग्रेस भवनाच्या परिसरातून सुरू झालेल्या या आंदोलनात एका गॅस सिलिंडरला हार घालून त्याला तिरडीवर ठेवण्यात आले. नंतर ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आली. तिरडीसोबत काँग्रेस कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. वाढत्या महागाईमुळे गरिब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिवसेंदिवस आर्थिक ओझे वाढत असल्याचा आरोप करत या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारला कडक संदेश देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड