इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का
कॅलिफोर्निया, 12 मार्च (हिं.स.)पाच वेळा विजेता राहिलेल्या नोवाक जोकोविचचा इंडियन वेल्स ओपनमधील आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले. २४ वर्षीय जॅक ड्रेपरने पहिला सेट गमावूनही २ तास ३५ मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोविचचा पराभव केला. या स्पर्धेत गतविज
नोवाक जोकोविच  आणि जॅक ड्रेपर


कॅलिफोर्निया, 12 मार्च (हिं.स.)पाच वेळा विजेता राहिलेल्या नोवाक जोकोविचचा इंडियन वेल्स ओपनमधील आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले. २४ वर्षीय जॅक ड्रेपरने पहिला सेट गमावूनही २ तास ३५ मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोविचचा पराभव केला.

या स्पर्धेत गतविजेता जॅक ड्रेपरने पुन्हा एकदा आक्रमक खेळ केला. आणि पहिला सेट गमावल्यानंतर चौथ्या फेरीत पाच वेळा विजेता नोवाक जोकोविचचा पराभव करून जोरदार पुनरागमन केले. त्याने हा सामना ४-६, ६-४, ७-६ (५) असा जिंकला. हाताच्या दुखापतीमुळे आठ महिन्यांच्या अनुपस्थितीनंतर परतलेल्या २४ वर्षीय ड्रेपरने या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा सामना दोन तास ३५ मिनिटे चालला. त्याचा पुढचा सामना डॅनिल मेदवेदेवशी होईल. मेदवेदेवने दुसऱ्या सामन्यात अॅलेक्स मिशेलसेनचा ६-२, ६-४ असा पराभव केला.

तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने ६-५ ने आघाडी घेतली होतीय पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही आणि ड्रेपरने पुनरागमन केले आणि सामना टायब्रेकरमध्ये नेला. सामन्यानंतर ड्रेपर म्हणाला, मला अजूनही वाटत नाही की मी माझ्या मनाप्रमाणे खेळत आहे. पण मी चांगले प्रदर्शन करण्यास वचनबद्ध आहे.

२४ वेळा ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या जोकोविचने २००८, २०११, २०१४, २०१५ आणि २०१६ मध्ये इंडियन वेल्सचे विजेतेपद जिंकले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याचे ११ वे विजेतेपद जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता. पण अंतिम फेरीत कार्लोस अल्कारजकडून त्याला पराभव पत्करावा लागला. अव्वल मानांकित कार्लोस अल्कारजने १ तास ३० मिनिटे चाललेल्या सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-१, ७-६ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande