कोईम्बतूरमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजचा प्रवेश
मुंबई, 13 मार्च (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या ''गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड''ने (GPL), कोईम्बतूर येथे सुमारे 44 एकर भूखंड थेट खरेदीद्वारे (outright purchase) संपादित केल्याची घोषणा आज केली. सुमारे 1.1 दशलक्ष चौरस
Coimbatore


मुंबई, 13 मार्च (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या 'गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड'ने (GPL), कोईम्बतूर येथे सुमारे 44 एकर भूखंड थेट खरेदीद्वारे (outright purchase) संपादित केल्याची घोषणा आज केली. सुमारे 1.1 दशलक्ष चौरस फूट विकास क्षमता असलेला आणि अंदाजे 450 कोटी रुपये* महसूल मिळण्याची क्षमता असलेला, एक 'प्रीमियम प्लॉटेड निवासी प्रकल्प' या जागेवर विकसित करण्याची कंपनीची योजना आहे.

प्रस्तावित विकास प्रकल्पामध्ये एक नियोजनबद्ध निवासी आराखडा सादर केला जाईल, ज्यामध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा, निसर्गरम्य मोकळ्या जागा आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या रचना तसेच शाश्वततेच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशा सुविधांचा समावेश असेल. दक्षिण कोईम्बतूरमधील सर्वाधिक पसंतीस उतरणाऱ्या निवासी क्षेत्रांपैकी (micro-markets) एका भागात ही जागा असून ती 'कोईम्बतूर गोल्फ क्लब'च्या अगदी जवळ आहे.

या संपादनामुळे GPL चा कोईम्बतूरमध्ये प्रवेश झाला असून, भारतातील उच्च-वाढीची क्षमता असलेल्या शहरांमध्ये विस्तार करण्याच्या कंपनीच्या धोरणाला यामुळे अधिक बळकटी मिळाली आहे. या घडामोडींमुळे आर्थिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या शहरी केंद्रांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजची उपस्थिती अधिक मजबूत होते; तसेच, प्रादेशिक बूकिंगच्या रचनेत वैविध्य येते. तिच्या वेगाने विस्तारणाऱ्या 'प्लॉटेड डेव्हलपमेंट' (भूखंड विकास) प्रकल्पांच्या पोर्टफोलिओचा विस्तार अधिक वेगाने होतो.

उत्पादन, IT/ITES, शिक्षण, आरोग्यसेवा आणि लघु व मध्यम उद्योगांच्या (SME) भक्कम पायाच्या आधारे कोइम्बतूर वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थेत वेगाने रूपांतरित होत आहे. या शहराची सुदृढ पायाभूत सुविधा, डिस्पोजेबल उत्पन्न आणि स्थिर आर्थिक गती यामुळे घरांच्या मागणीला सातत्याने बळ मिळत आहे. परवडणारी किंमत, बांधकामातील लवचिकता आणि दीर्घकालीन मूल्यवृद्धीची प्रबळ क्षमता यांमुळे 'प्लॉटेड डेव्हलपमेंट्स'ना (भूखंड विकास प्रकल्पांना) सध्या मोठी पसंती मिळत आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO), गौरव पांडे म्हणाले, “देशभरातील उच्च क्षमता असलेल्या शहरांमध्ये ‘प्लॉटेड डेव्हलपमेंट’च्या (भूखंड विकासाच्या) उद्देशाने विस्तार करण्याच्या आमच्या धोरणाशी कोइम्बतूरमधील आमचा हा प्रवेश सुसंगत आहे. कोइम्बतूरचा भक्कम आर्थिक पाया आणि ग्राहकांकडून होत असलेली सातत्यपूर्ण मागणी, यामुळे हे शहर एक अत्यंत आकर्षक बाजारपेठ ठरते. दक्षिण भारतात आमचे अस्तित्व अधिक बळकट करणारी, उत्तम दर्जाची ‘प्लॉटेड कम्युनिटी’ विकसित करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande