
नवी दिल्ली, 13 मार्च (हिं.स.)। व्होल्टास लिमिटेड या टाटा एंटरप्राइजने वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत असलेल्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागासोबत (डीपीआयआयटी) धोरणात्मक सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत उद्योग व स्टार्ट-अप यांच्यामधील सहयोगाला अधिक पक्के करण्यात येईल, तसेच भारतातील कूलिंग व स्मार्ट अप्लायन्स परिसंस्थेमध्ये नाविन्यतेला गती देण्यात येईल. डीपीआयआयटीचे संचालक डॉ. सुमीत कुमार जरंगल आणि व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मुकुंदन मेनन यांनी दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करत औपचारिकरित्या हा सहयोग करण्यात आला.
या सहयोगाचा हीटींग, व्हेण्टिलेशन व एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी), प्रगत कंट्रोल सिस्टम्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निंग-आधारित डायग्नोस्टिक्स, आयओटी-सक्षम स्मार्ट अप्लायन्सेस आणि उत्पादन व सेवा कार्यसंचालनांमध्ये डिजिटलायझेशन अशा क्षेत्रांमध्ये नेक्स्ट-जनरेशन तंत्रज्ञानांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप्सना पाठिंबा देण्याचा मनसुबा आहे. या सहयोगाचा भाग म्हणून व्होल्टास लिमिटेड व स्टार्टअप इंडिया भारत स्टार्ट-अप ग्रँड चॅलेंज प्लॅटफॉर्मअंतर्गत नाविन्यतेसंदर्भात आव्हाने रचेल, तसेच उद्योगाशी संबंधित आव्हानांचे निराकरण करण्याचा मनसुबा असलेल्या लक्ष्यित हॅकेथॉन्सचे आयोजन करेल.
याप्रसंगी मत व्यक्त करत डीपीआयआयटीचे सहसचिव श्री. संजीव म्हणाले, या सहयोगामधून उद्योग व स्टार्टअप यांच्यामधील भागीदारी मजबूत करण्यावर आणि प्रगत उत्पादन व डीप-टेक क्षेत्रांमध्ये स्वदेशी नाविन्यतेला चालना देण्यावर सरकारचा सातत्यपूर्ण फोकस दिसून येतो. “स्टार्ट-अप्सना उद्योगामधील आघाडीच्या कंपन्यांसोबत संलग्न केल्याने उद्योजक नाविन्यपूर्ण संकल्पनांना वास्तविक विश्वातील उपयोजनांसह विकासात्मक उत्पादने व सोल्यूशन्समध्ये रूपांतरित करण्यास सक्षम होतील,'' असे ते म्हणाले.
स्टार्ट-अप इंडियाचे संचालक डॉ. सुमीत कुमार जरंगल म्हणाले, डीपीआयआयटी व्होल्टास आणि व्यापक स्टार्ट-अप इंडिया परिसंस्था यांच्यामध्ये सखोल सहयोगाची सुविधा देईल. “यामध्ये विस्तारित उपक्रम पोहोच, डीपीआयआयटी-मान्यताकृत स्टार्ट-अप्सकडून प्रेरणादायी सहभाग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर लक्ष केंद्रित केलेली नाविन्यपूर्ण आव्हाने, हॅकेथॉन्स व प्रायोगिक-तत्त्वावरील उपक्रम अशा सक्षम सहयोगात्मक उपक्रमांचा समावेश असेल,'' असे ते म्हणाले.
व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मुकुंदन मेनन म्हणाले, या सहयोगामधून भारतातील नाविन्यता परिसंस्था प्रबळ करण्याप्रती आणि नेक्स्ट-जनरेशन कूलिंग तंत्रज्ञानांच्या विकासाला पाठिंबा देण्याप्रती व्होल्टासची कटिबद्धता दिसून येते. ते पुढे म्हणाले, स्टार्ट-अप्ससोबत सहयोग ऊर्जा-कार्यक्षम कूलिंग सोल्यूशन्स, स्मार्ट अप्लायन्सेस, अंदाजात्मक डायग्नोस्टिक्स आणि डिजिटल सेवा प्लॅटफॉर्म्सना प्रगत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते, ज्यासह उदयोन्मुख तंत्रज्ञान उद्योजक त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रगत करण्यास सक्षम होतील.
या सहयोगांतर्गत व्होल्टास स्टार्टअप इंडिया उपक्रमासह काम करेल, जेथे उदयोन्मुख उद्योग गरजांशी संलग्न असलेल्या उच्च क्षमतेच्या स्टार्ट-अप्सना ओळखेल व पाठिंबा देईल. या उपक्रमांतर्गत निवडक स्टार्टअप्सना उत्पादन विकास व व्यावसायिक अवलंबनाला गती देण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन, टेक्निकल मार्गदर्शन, संशोधन व चाचणी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेशी संपर्क उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये ऊर्जा-कार्यक्षम कूलिंग सिस्टम्स, एअर-क्वॉलिटी मॉनिटरिंग व फिल्ट्रेशन तंत्रज्ञान, प्रगत इन्व्हर्टर कंट्रोल्स, प्रीडिक्टिव्ह मेन्टेनन्स सोल्यूशन्स, रेफ्रिजेरण्ट सेफ्टी सिस्टम्स आणि इन्स्टॉलेशन व सर्विसिंगसाठी डिजिटल टूल्स अशा क्षेत्रांचा समावेश असू शकतो. निवडक स्टार्ट-अप्स संरचित प्रूफ-ऑफ-कन्सेप्ट (पीओसी) उपक्रमांमध्ये देखील सहभाग घेऊ शकतात, जेथे ते उत्पादनाचे सत्यापन व तंत्रज्ञान एकीकरणासाठी व्होल्टास इंजीनिअरिंग टीम्ससोबत काम करतील. हा सहयोग नाविन्यपूर्ण उपायांची चाचणी, सुधारणा आणि व्यावसायिक अंमलबजावणीसाठी व्होल्टासच्या सर्विस नेटवर्कद्वारे फील्ड ट्रायल्स (क्षेत्रीय चाचण्या) घेण्यास देखील मदत करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर