परभणी - मेघना बोर्डीकर यांच्या आदेशाने जिल्ह्राभरातील ग्रामसेवक सतर्क
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर जिल्हाभरातील ग्रामसेवक व इतर अधिकारी-कर्मचारी सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. जिंतूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या 62 ग्रामसेवकांपैकी चार ग्रामसेवकांनी फेब्रुवा
परभणी - मेघना बोर्डीकर यांच्या आदेशाने जिल्ह्राभरातील ग्रामसेवक सतर्क


परभणी, 13 मार्च (हिं.स.)। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर जिल्हाभरातील ग्रामसेवक व इतर अधिकारी-कर्मचारी सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. जिंतूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या 62 ग्रामसेवकांपैकी चार ग्रामसेवकांनी फेब्रुवारी 2026 महिन्याची दैनंदिनी (डायरी) सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकारातून प्रदीप कोकडवार यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणाबाबत कालच्या अंकात बातमी प्रसिद्ध होताच जिल्हाभरातील कर्मचारी वर्गात, विशेषत: ग्रामसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक तालुक्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याची चर्चा कर्मचारी वर्गात सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामसेवकांनी दैनंदिनी सादर न करता शासकीय कामकाज कसे केले? त्यांनी केलेल्या कामाची नोंद आजवर का केली नाही? याचा अर्थ ते मुख्यालयात न जाता कारभार करीत होते का? तसेच त्यांचे नियमित वेतन कसे काढले गेले आणि वरिष्ठ अधिकार्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का केले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व बाबींची चौकशी होणार असल्याने आता मुख्यकार्यकारी अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande