इराणचा अमेरिकन युद्धनौका ‘युएसएस अब्राहम लिंकन’वर हल्ल्याचा दावा
तेहरान, 13 मार्च (हिं.स.)।अमेरिकेला अशी अपेक्षा होती की त्यांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेल्यानंतर युद्ध लवकर संपेल. मात्र इराणने ज्या प्रकारे जोरदार पलटवार केला आहे, त्यामुळे अमेरिका आता पश्चिम आशियात अडकत चालल्याचे चित्र दिसत आहे. द
इराणचा अमेरिकन युद्धनौका ‘युएसएस अब्राहम लिंकन’वर हल्ल्याचा दावा


तेहरान, 13 मार्च (हिं.स.)।अमेरिकेला अशी अपेक्षा होती की त्यांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेल्यानंतर युद्ध लवकर संपेल. मात्र इराणने ज्या प्रकारे जोरदार पलटवार केला आहे, त्यामुळे अमेरिका आता पश्चिम आशियात अडकत चालल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने अमेरिकेच्या शक्तिशाली युद्धनौकेवर यूएसएस अब्राहम लिंकनवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

आयआरजीसीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने अमेरिकन युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन ला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे युद्धनौका कार्यक्षम राहिली नाही आणि तिला खाडी परिसरातील जलक्षेत्रातून माघार घ्यावी लागली, असा इराणचा दावा आहे. मात्र अमेरिकेने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

इराणने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की अचूक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याद्वारे अमेरिकन युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन ला लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला ओमानच्या जलक्षेत्रात झाला असून ते इराणच्या सागरी सीमारेषेपासून सुमारे ३४० किलोमीटर अंतरावर आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर अमेरिकन युद्धनौका आणि तिचा स्ट्राइक ग्रुप मागे हटल्याचे सांगितले आहे. मात्र या दाव्याच्या समर्थनार्थ इराणच्या सरकारी माध्यमांनी कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. तरीही आयआरजीसी ने अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा कायम ठेवला आहे.

दरम्यान, इराणच्या या दाव्याला अमेरिकेने स्पष्टपणे नाकारले आहे. यूएस सेंट्रल कमांड ने यूएसएस अब्राहम लिंकन ची एक छायाचित्र प्रसिद्ध करत म्हटले आहे की अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुप अजूनही ऑपरेशन एपिक फ्युरी मध्ये सक्रियपणे सहभागी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande