ओव्हरटेक करताना दुचाकीची ट्रॅकरला धडक; चालकाचा मृत्यू
रायगड, 14 मार्च (हिं.स.)। अलिबाग–रेवस मार्गावर धोकवडे गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करताना दुचाकी ट्रॅकरला धडकून हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा
Bike hits truck while overtaking; driver dies


रायगड, 14 मार्च (हिं.स.)। अलिबाग–रेवस मार्गावर धोकवडे गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करताना दुचाकी ट्रॅकरला धडकून हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोकवडे गावाच्या हद्दीत अलिबाग–रेवस रोडवर राऊत चिकन सेंटरसमोर घडली. फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅकर (क्रमांक एमएच 15 सीके 0411) अलिबाग–रेवस मार्गावरून चालवत जात होते.दरम्यान त्यांच्या मागून येणाऱ्या एनटॉर्क (क्रमांक एमएच 02 जीएफ 1949) या दुचाकीवरील चालकाने अतिवेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. ट्रॅकरला ओव्हरटेक करताना दुचाकीचा ताबा सुटून ट्रॅकरच्या मागील टायरजवळ जोरदार धडक बसली.या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेत दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 25/2026 नोंद करण्यात आला असून मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 184 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 106(1), 281, 324(4), 125(अ), 125(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राजू शिदे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande