चैत्री यात्रेत गॅसपुरवठा सुरळीत ठेवा - सचिन इथापे
सोलापूर, 14 मार्च, (हिं.स.)। चैत्री शुद्ध एकादशी 29 मार्च रोजी साजरी होत आहे. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यात्रेत शहरात व परिसरात विविध ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीसाठी दुकाने उभारण्यात य
Vithal


सोलापूर, 14 मार्च, (हिं.स.)। चैत्री शुद्ध एकादशी 29 मार्च रोजी साजरी होत आहे. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यात्रेत शहरात व परिसरात विविध ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीसाठी दुकाने उभारण्यात येतात. या कालावधीत गॅसचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी विशेष पथकामार्फत तपासणी करावी. तसेच, घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहील, याबाबतची प्राधान्याने दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या आहेत.

चैत्री यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोसले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande