पूर्णेत 24 मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
परभणी, 14 मार्च (हिं.स.)। 24 मे रोजी पूर्णा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही लग्न थांबू नये तसेच समाजातील गरीब, शेतकरी, कष्टकरी व वंचित घटकातील तरु
पूर्णेत 24 मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन


परभणी, 14 मार्च (हिं.स.)।

24 मे रोजी पूर्णा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही लग्न थांबू नये तसेच समाजातील गरीब, शेतकरी, कष्टकरी व वंचित घटकातील तरुण-तरुणींना सन्मानाने विवाहबद्ध होता यावे, या उद्देशाने नांदेड येथील श्री गुरु सेवाभावी संस्था यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, या सोहळ्यात सहभागी होणार्या प्रत्येक जोडप्याला शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत 25 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हा सामूहिक विवाह सोहळा रविवार 24 मे 2026 रोजी दुपारी 12.35 वाजता जिल्हा परिषद शाळा येथे संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात सहभागी होणार्या प्रत्येक जोडप्याचा विवाह त्यांच्या धर्म व परंपरेनुसार लावून देण्यात येणार आहे.

सामूहिक विवाहासाठी नोंदणी करताना वधूचे वय किमान 18 वर्षे व वराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून त्यासाठी जन्म दाखला किंवा आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. तसेच रहिवासी प्रमाणपत्र, टी.सी. किंवा ग्रामपंचायतीचा वयाचा दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व वधूच्या आई किंवा वडिलांच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावी लागणार आहे.

या सामूहिक विवाह सोहळ्याचे संयोजक चक्रवती वाघमारे असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 8862058111, 9112252852, 9112749397 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande