सोलापूर - पापरीची 'पीएम श्री' जिल्हा परिषद शाळेला 'ए प्लस' दर्जा
सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)। मोहोळ शाळा गुणवत्ता मूल्यांकनात पापरीच्या पीएमश्री शाळेने ''ए प्लस'' श्रेणी प्राप्त केली असून, ही श्रेणी प्राप्त करणारी मोहोळ तालुक्यातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकमेव ठरली. या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मा
school


सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।

मोहोळ शाळा गुणवत्ता मूल्यांकनात पापरीच्या पीएमश्री शाळेने 'ए प्लस' श्रेणी प्राप्त केली असून, ही श्रेणी प्राप्त करणारी मोहोळ तालुक्यातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकमेव ठरली. या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.या यशा मुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे म्हणाले, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत राज्यातील शाळांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व स्वयंम् अर्थ सहाय्यीत शाळांचा सहभाग होता.स्वयं मूल्यांकनानंतर 'ए प्लस' श्रेणी पात्र ठरलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन एससीआरटी मार्फत करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande