उज्ज्वला योजना : ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट
सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)। महिलांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांची आरोग्यमानता सुधारून तिचे सक्षमीकरण करावे म्हणून केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योज
उज्ज्वला योजना : ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट


सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।

महिलांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांची आरोग्यमानता सुधारून तिचे सक्षमीकरण करावे म्हणून केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. दरवर्षी किमान नऊ गॅस सिलिंडरसाठी त्यांना प्रत्येकी ३०० रुपयांची सबसिडी सुरू केली. मात्र, सद्य:स्थितीत गावाकडील उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींसह सर्वच महिलांना ४५ ते ५० दिवसांनंतर सिलिंडर मिळणार असल्याने त्यांना पुन्हा चुली पेटवाव्या लागल्या आहेत.

प्रत्येक घरगुती गॅस ग्राहकाला एका वर्षात १४.२ किलो वजनाचे १२ अनुदानित गॅस सिलिंडर मिळतात. पाच किलोचे सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी ही मर्यादा एका वर्षासाठी ३४ सिलिंडरची आहे. मात्र, सध्या इराक-इराण-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. पूर्वी उज्ज्वला योजनेसह अन्य कुटुंबाला दरमहा किमान एक गॅस सिलिंडर मिळत होते, पण आता दीड महिन्यानंतर सिलिंडर मिळणार असल्याने मोठे कुटुंब असलेल्यांना विशेष: ग्रामीणमध्ये चुली पेटवून स्वयंपाक करावा लागत आहे. आता पुन्हा ‘ती’च्या डोळ्यात धूर पहायला मिळत आहे. गावागावातील लोक उन्हाच्या तडाख्यात सरपणाच्या शोधात बाहेर पडू लागले आहेत. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत अशीच स्थिती राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande