रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या कोट्यात मे महिन्यापासून वाढ
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : येत्या मे महिन्यापासून कोकण रेल्वेच्या कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये 2AC, 3AC, 3E या डब्यांमध्ये 50 टक्के वाढ करण्यात आली असून स्लीपर कोट्यामध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रवासी सल्ला
सचिन वहाळकर संतोषकुमार झा


रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : येत्या मे महिन्यापासून कोकण रेल्वेच्या कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये 2AC, 3AC, 3E या डब्यांमध्ये 50 टक्के वाढ करण्यात आली असून स्लीपर कोट्यामध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची तेविसावी बैठक नवी मुंबई कोकण रेल्वेच्या मुख्यालयात पार पडली. बैठकीला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील समिती सदस्य तसेच कोकण रेल्वेचे बोर्ड ऑफ संचालक उपस्थित होते. यावेळी प्रवासी सल्लागार समितीचे रत्नागिरीचे सदस्य सचिन वहाळकर उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच रत्नागिरी स्टेशनच्या कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, वंदे भारतचा कोटा वाढवण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वीच झालेल्या समितीच्या बैठकीत हा कोटा वाढविण्यास मान्यता देण्यात आली होती, मात्र त्याची चअंमलबजावणी झाली नव्हती. ती येत्या मे महिन्यापासून होणार आहे. PRS टर्मिनलवर त्याप्रमाणे पाच मार्च रोजी सुधारणा करण्यात आली आहे. याशिवाय जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये चेअर कार, व सेकंड सीटिंग या दोन्ही क्लासमध्ये आणि वंदे भारतच्या चेअर कारमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड येथील प्रवाशांना होणार आहे. हा कोटा मडगाव येथून रत्नागिरी स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

ही मागणी मान्य केल्याबद्दल सचिन वहाळकर यांनी वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव तसेच कोकण रेल्वे सीएमडी संतोषकुमार झा यांचे आभार मानले. भविष्यात प्रशासनाकडून हा कोटा टप्प्याटप्प्प्याने वाढवण्यास मान्यता दिली आहे.कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जेथे अजूनही रिमोट कोटा सिस्टीम कार्यरत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सचिन वहाळकर यांच्या प्रयत्नानून रत्नागिरीत चार गाड्यांमधील कोट्यामध्ये वाढ झाली.

याच बैठकीत सचिन वहाळकर यांनी रत्नागिरी दिवा गाडी पुन्हा दादरपर्यंत नेण्याचा मुद्दा उपस्थित केला असता कोकण रेल्वे प्रशासन मध्य रेल्वेकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून हा विषय पूर्णपणे मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने त्या पातळीवर हा निर्णय होणे अपेक्षित आहे. यावर हा निर्णय होईपर्यंत दिव्यावरून ही गाडी उशिरा सुटत असल्याने रत्नागिरी स्टेशनवर पोचण्यास रात्री खूप उशीर होत असून या गाडीच्या दिव्यावरून सुटण्याच्या वेळेत बदल करून ती लवकर सोडण्यात येण्याची मागणी सचिन वहाळकर यांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत या बाबत येत्या आठ दिवसांत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दिवा रत्नागिरी गाडी लवकर सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले.बैठकीला आमदार संजय केळकर तसेच खासदार अनुप धोत्रे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande