स्पृहा तेजराज भावेची ‘डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : येथील फाटक हायस्कूलची सहावीतील विद्यार्थिनी कु. स्पृहा तेजराज भावे हिची ‘डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2025- 2026’ या अखिल भारतीय स्पर्धा उपक्रमात प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठीच्या आणि मुलाखतीच्या अंतिम फेर
स्पृहा भावे


रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : येथील फाटक हायस्कूलची सहावीतील विद्यार्थिनी कु. स्पृहा तेजराज भावे हिची ‘डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2025- 2026’ या अखिल भारतीय स्पर्धा उपक्रमात प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठीच्या आणि मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमात यावर्षी एक लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन अहवाल आणि मुलाखत अशा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते. स्पर्धेमध्ये स्पृहा तेजराज भावे हिने परीक्षेच्या दोन फेऱ्या उत्तीर्ण करून तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी ती निवडली गेली आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीतून निवड झालेली ही एकमेव विद्यार्थिनी फाटक हायस्कूलची आहे.

स्पर्धेसाठी फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक कीर, विज्ञान शिक्षिका सौ. श्रावणी जोशी, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. मुरूडकर, कलाशिक्षक नीलेश पावसकर यांनी तिला मार्गदर्शन केले.कृती संशोधन प्रकल्पासाठी स्पृहाला प्रतिथयश संशोधक डॉ. स्वप्नजा मोहिते यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

स्पर्धेचे हे 45वे वर्ष आहे. यंदाच्या स्पर्धेची संकल्पना पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप) असा आहे. या विषयावर माणसाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीमध्ये कसे परिणाम होतात याविषयी एक प्रकल्प स्पृहा सध्या तयार करीत आहे. तिसऱ्या फेरीसाठी हा कृती संशोधन प्रकल्प तिला सादर करावयाचा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande