मेळघाटातील धूळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर
अमरावती, 15 मार्च (हिं.स.) मेळघाटातील दुर्गम व आदिवासीबहूल भागात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा, या उद्देशाने धूळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर राबविण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या
मेळघाटात ‘शासन आपल्या दारी’ धूळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर


अमरावती, 15 मार्च (हिं.स.)

मेळघाटातील दुर्गम व आदिवासीबहूल भागात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा, या उद्देशाने धूळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर राबविण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तर धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नियोजनातून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या सेवा सहज उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, विद्युत वितरण कंपनी तसेच इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेत नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यांचे समाधान केले. तसेच अनेक प्रकरणांवर तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी सांगितले की, मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे म्हणजेच ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होणे होय. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न सोडविणे होय, असे सांगितले.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande