
ओमराजे निवाळकर यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार प्रदान
नाशिक, 15 मार्च (हिं.स.)।
सध्याच्या तरुण पिढीमध्ये राजकारण आणि राजकारण्यांबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत.
ते दूर करण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांची आहे. चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीना सन्मानित करून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे काम संस्थांनी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येथे केले.
स्वर्गीय माधवराव लिमये स्मृती प्रीत्यर्थ 'कार्यक्षम खासदार पुरस्कार' धाराशिवचे खासदार ओमराजे निवाळकर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी नार्वेकर बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार राजाभाऊ बाजे,आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर आइके, माजी नगरसेवक सचिन महाजन, डॉ. विनायकराव नेलींकर, डॉ. शोभाताई नेलॉकर, भावना नेलींकर, जयप्रकाश जातेगावकर उपस्थित होते. सावाना संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके अध्यक्षस्थानी होते. ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केलेले प्रभावी काम, मतदारसंघातील विकासासाठी राबवलेले विविध उपक्रम तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत घेतलेली ठाम भूमिका याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नार्वेकर यांनी निंबाळकर यांच्या कार्याचे कौतुक करत लोकप्रतिनिधीनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांतून जनतेचा विश्वास संपादनाचा प्रयत्न
पुरस्कार स्वीकारल्यानंतर खा. ओमराजे निवाळकर यांनी हा सन्मान धाराशिवच्या जनतेचा असल्याचे नमूद केले. वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या आपल्या राजकीय प्रवासाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. विरोधकांचा आवाज कायमचा बंद करण्याच्या हेतूने त्यांची हत्या करण्यात आली होती; मात्र तो हेतू साध्य होऊ नये म्हणून आपण राजकारणात प्रवेश केला आणि विकासकामांतून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV