देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साथ उपलब्ध- केंद्र सरकार
नवी दिल्ली , 15 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील इंधनस्थितीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की पेट्रोल, डिझेल, गॅस आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत असून देशात या इंधनांचा पुरेसा
देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साथ उपलब्ध- केंद्र सरकार


नवी दिल्ली , 15 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील इंधनस्थितीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की पेट्रोल, डिझेल, गॅस आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत असून देशात या इंधनांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

सरकारच्या माहितीनुसार देशातील सर्व रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत आणि कच्च्या तेलाचाही पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. तसेच भारत पेट्रोल आणि डिझेल उत्पादनात आत्मनिर्भर असल्याने देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी या दोन्ही इंधनांची आयात करण्याची गरज नसल्याचेही सांगण्यात आले. तेल विपणन कंपन्यांकडून देशभरातील पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन संपल्याची घटना समोर आलेली नाही. नागरिकांनी घाबरून पेट्रोल किंवा डिझेलची अतिरिक्त खरेदी करू नये, कारण देशभरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सरकारने आवाहन केले आहे.

नैसर्गिक वायूबाबत सरकारने सांगितले की प्राधान्य क्षेत्रांना पूर्ण पुरवठा केला जात आहे. घरगुती पाइप गॅस आणि सीएनजीसाठी १०० टक्के गॅस पुरवठा सुरू आहे, तर औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी गॅस पुरवठा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्यात आला आहे.शहरे आणि शहरी भागांमध्ये एलपीजीचा वापर करणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांना पाइप गॅस कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी नागरिक शहर गॅस वितरण कंपन्यांच्या पोर्टल, ईमेल किंवा पत्राद्वारे अर्ज करू शकतात.

१४ मार्च २०२६ रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ तसेच शहर गॅस वितरण कंपन्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पाइप गॅस कनेक्शनची स्थिती आणि एलपीजीवरून पाइप गॅसकडे संक्रमण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. शहरांमधील गॅस पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी या दिशेने काम वेगाने सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता एलपीजी पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचेही सरकारने सांगितले. देशातील कोणत्याही एलपीजी वितरकाकडे गॅस संपल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.मात्र, अलीकडच्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडर बुकिंगमध्ये घट दिसून आली आहे. शनिवारी सुमारे ७७ लाख बुकिंग नोंदवण्यात आली, तर १३ मार्च रोजी ही संख्या अंदाजे ८८.८ लाख होती.

एलपीजी सिलेंडरच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. सरकारच्या माहितीनुसार पूर्वी सुमारे ८४ टक्के बुकिंग ऑनलाइन होत होती, जी आता वाढून जवळपास ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. बिहार, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानसह अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गैर-घरगुती एलपीजी सिलेंडर वाटपाचे आदेश जारी केले आहेत.व्यावसायिक एलपीजी सिलेंडर राज्य सरकारांना प्राधान्याने वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून सध्या देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्राहकांसाठी ते उपलब्ध आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande