छ.संभाजीनगर जिल्ह्यात २८८७ प्रकरणे तडजोडीने निकाली; ४६.९० कोटींची वसुली
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय लोकअदालत मध्ये प्रलंबित व वादपूर्व असे एकूण २८८७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघ
छ.संभाजीनगर जिल्ह्यात २८८७ प्रकरणे तडजोडीने निकाली; ४६.९० कोटींची वसुली


छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय लोकअदालत मध्ये प्रलंबित व वादपूर्व असे एकूण २८८७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. याद्वारे ४६ कोटी ९० लक्ष ८२ हजार ९२४ रुपये वसुली करण्यात आली असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी कळविले आहे.

प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन करण्यात आले. त्यात विविध शासकीय विभाग, वीज कंपनी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी इ. सहभाग घेतला.

या लोकअदालतीत २६१४ प्रलंबित व २७३ दाखलपूर्व असे एकूण २८८७ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्यात प्रलंबित प्रकरणांमध्ये ४४ कोटी ३१ लक्ष १४ हजार ४८९ रुपये रक्कम वसुली झाली. तर दाखलपूर्व प्रकरणांमध्ये २ कोटी ५९ लक्ष ६८ हजार ४३५ असे एकूण ४६ कोटी ९० लाख ८२ हजार ९२४ रुपये इतक्या रकमेची वसुली झाली. राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्ह्यात एकूण ३४ पॅनल तयार करण्यात आले होते,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande