अवैध वाळू साठ्यासह दोन टीप्पर, जेबीसी जप्त
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। देगाव (ता. पंढरपूर) येथे देगाव ते बाभूळगाव जाणाऱ्या रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ करण्यात आलेल्या अवैध वाळूचा साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत दोन टीप्पर, एक जेसीबी व 8 ब्रास अवैध वा
अवैध वाळू साठ्यासह दोन टीप्पर, जेबीसी जप्त


सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)।

देगाव (ता. पंढरपूर) येथे देगाव ते बाभूळगाव जाणाऱ्या रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ करण्यात आलेल्या अवैध वाळूचा साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत दोन टीप्पर, एक जेसीबी व 8 ब्रास अवैध वाळू साठा 14 मार्च रोजी जप्त करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना गोपनिय माहिती मिळाल्याने त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकातील पोलीस अंमलदार हे देगाव येथे गेले. देगाव ते बाभूळगाव जाणारे रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ मोकळ्या जागेत वाळू साठा दिसून आला.वाळू जेसीबी मशीनच्या साह्याने दोन टीप्पर वाहनात भरत असल्याचे दिसून आले. तेव्हा टीप्पर आणि जेसीबी चालकास जागीच पकडण्यात आले. जेसीबी चालक प्रवीण नानासाहेब बोराटे (35) रा. मुंडेवाडी, ता. पंढरपूर तसेच टिपरचालक विश्वास हनुमंत चव्हाण (43) रा. सुस्ते ता. पंढरपूर, तर मालक बालाजी मारुती पवार रा. देगाव असे असल्याचे सांगितले. तर टिपर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी सदरचे टिपर हे सोमनाथ जाधव रा. देगाव यांचे मालकीची असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande