पश्चिम बंगालमध्ये ईडीची 10 ठिकाणी छापेमारी
अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण हावडा, 16 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी मोठी कारवाई करत राज्यातील विविध भागांमध्ये छापेमारी केली. अवैध कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणा
ईडी लोगो


अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण

हावडा, 16 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी मोठी कारवाई करत राज्यातील विविध भागांमध्ये छापेमारी केली. अवैध कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिलीगुडी, हावडा, बिधाननगर आणि दुर्गापूर या भागांमध्ये सुमारे 10 ठिकाणी तपासणी करण्यात आली. या प्रकरणात सुरश्री कर, सम्राट घोष आणि सुभजीत चक्रवर्ती यांची नावे समोर आली असून ईडीची पथके त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहेत. या आरोपींवर कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक निरपराध लोकांना फसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. सध्या जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे आणि साहित्याची तपासणी सुरू असून या संपूर्ण फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे.दरम्यान, या प्रकरणाचा कोणताही संबंध निवडणूक निधी किंवा राजकारणाशी आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. तपास यंत्रणा सर्व शक्यता लक्षात घेऊन प्रकरणाची चौकशी करत आहे.

ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वातावरण तापलेले आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यांत मतदान होणार असून निकाल 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande