नाशिकमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग प्रकरणात लाखोंची फसवणूक
Four people cheated of Rs 27 lakhs on the pretext of Forex trading
नाशिकमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग प्रकरणात लाखोंची फसवणूक


रोहित व सिद्धार्थ जांभूळकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

नाशिक, १६ मार्च (हिं.स.) : नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल प्रभाकर चव्हाण (रा. शिवशक्ती चौक, नवीन सिडको) यांनी खासगी नोकरदार असून आर्थिक फसवणुकीचा शिकार ठरले. आरोपी रोहित जांभूळकर आणि सिद्धार्थ जांभूळकर (दोघेही रा. फाशीच्या डोंगराजवळ, ध्रुवनगर, सातपूर) यांनी कॅनडा कॉर्नर येथील बिझनेस स्क्वेअरमध्ये आरजे ट्रेडर्स नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग सुरु करून, सेबीकडे रजिस्टर असल्याचा खोटा दावा केला.

याद्वारे त्यांनी चव्हाण यांना निर्मल बंग प्रा. लि. कंपनीत फॉरेक्स ट्रेडिंगसाठी गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. आरोपींनी बनावट लेटरहेड आणि स्टेटमेंट तयार करून रोख व NEFT/चेकद्वारे फिर्यादीकडून एकूण १७ लाख रुपये स्वीकारले.त्याचप्रमाणे, चव्हाण यांच्या परिचयातील वैभव शशिकांत भणगे, पद्माकर बागडे आणि शेख शफिक अब्दुल रहिम यांच्याकडून अनुक्रमे ८० हजार, ४ लाख ३२ हजार आणि ४ लाख ९० हजार रुपये घेऊन आरोपींनी एकूण २७ लाख २ हजार रुपये फसवले. ही फसवणूक ५ सप्टेंबर २०२२ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत घडली.सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत

-----------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande