
जळगाव , 16 मार्च (हिं.स.)जळगावातील नवीन बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली दुचाकी अखेर जिल्हापेठ पोलिसांनी शोधून काढली असून या प्रकरणात मालेगावच्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून एका नागरिकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करण्यात आले.तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढत मालेगाव येथील मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि अबुबकर नईम कौसर यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी जळगाव बसस्थानक परिसरातून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. एमएच19 बीएस 1573) ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दुचाकी जप्त केली आहे
--------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर