
लातूर, 16 मार्च (हिं.स.)।
लातूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी सौ. उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी श्री. दयानंद सुरवसे यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौ. उषाताई पाटील तळेगावकर व श्री. दयानंद सुरवसे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय काम करत जनतेच्या प्रश्नांवर काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis